एक रुपयांत खरेदी करा सॅमसंगचा स्मार्टफोन
शुक्रवारी सॅमसंगने मेक फॉर इंडिया सेलिब्रेशनची घोषणा केली. या प्रोग्रामअंतर्गत भारतातील अनेक सॅमसंगच्या उत्पादनांवर मोठी सूट मिळणार आहे. १५ मे पर्यंत यूझर या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
मुंबई : शुक्रवारी सॅमसंगने मेक फॉर इंडिया सेलिब्रेशनची घोषणा केली. या प्रोग्रामअंतर्गत भारतातील अनेक सॅमसंगच्या उत्पादनांवर मोठी सूट मिळणार आहे. १५ मे पर्यंत यूझर या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
यासोबतच कंपनीने नो एक्स्टा कॉस्ट नावाची योजनाही सुरु केली. ज्यात ग्राहक एका रुपयांत स्मार्टफोन खरेदी करु शकतात आणि १० ईएमआयमध्ये रक्कम भरु शकता. मेक फॉर इंडिया सेलिब्रेशनअंतर्गत गॅलॅक्सी एस६ची किंमत ३३,९०० रुपये आणि नोट ५ ची किंमत ४२,९०० रुपये आहे. या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना १० टक्के कॅशबॅक ऑफर मिळेल.
तसेच तुम्ही हा स्मार्टफोन ३,६,९ आणि १२ महिन्यांच्या ईएमआयवरही खरेदी करु शकता. या ऑफरमध्ये तुम्ही गॅलॅक्सी ए७ २९,९०० आणि गॅलॅक्सी ए५ २ हजार ९०० रुपयांना खरेदी करु शकता.