एसबीआय बँक भरतीचा निकाल घोषीत
एसबीआय बँकेनं 17,140 क्लार्क भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल लागला आहे.
मुंबई : एसबीआय बँकेनं 17,140 क्लार्क भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल लागला आहे. या परीक्षेमध्ये पास झालेल्यांना मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे. पास झालेल्या या विद्यार्थ्यांना http://www.sbi.co.in/ या वेबसाईटवर जाऊन त्यांचे कॉल लेटर डाऊनलोड करावी लागणार आहेत.
कॉल लेटर असं करा डाऊनलोड
पहिले http://www.sbi.co.in/ या वेबसाईटवर जा
त्यानंतर career लिहीलेल्या टॅबवर क्लिक करा
latest announcements वर क्लिक केल्यावर खालून चौथ्या टॅबवर क्लिक करा.
मग call letter for candidates qualified for Main exam वर क्लिक करा.
यानंतर रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख ही माहिती भरा आणि लॉगिनवर क्लिक करा.
लॉगिन केल्यावर तुम्हाला तुमचं कॉल लेटर मिळेल. तुमचं कॉल लेटर 17 जून ते 26 जूनपर्यंतच ऑनलाईन उपलब्ध असेल. ही मुख्य परीक्षा 25 जून आणि 26 जूनला होणार आहे.
ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे. परीक्षेमध्ये जनरल आणि फायनानशिअल अवेरनेसचे 50 प्रश्न, क्वान्टिटेटिव्ह एप्टीट्यूडचे 50 प्रश्न आणि इंग्लिशचे 40 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. प्रत्येक प्रश्न हा एक मार्काचा असणार आहे. जनरल आणि फायनानशिअल अवेरनेससाठी 35-35 मिनीट, क्वान्टिटेटिव्ह एप्टीट्यूडसाठी 45 मिनीट एवढा वेळ मिळणार आहे. तर संपूर्ण परीक्षेसाठी 2 तास 40 मिनीटं मिळतील.
जनरल इंग्लिशसोडून सगळे प्रश्न इंग्लिश आणि हिंदी भाषेमध्ये असतील. या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंगही असणार आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तराला 1/4 मार्क कापले जातील. तसंच या परीक्षेमध्ये पास झालेल्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येणार आहे. मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यूमध्ये मिळवलेल्या मार्कांवरच बँकेची ही भरती होणार आहे.