मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखनं नुकतीच एक 'बीएमडब्ल्यू आय ८' ही आलिशान कार खरेदी केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरातील प्रसिद्ध असलेल्या स्पोर्टस कारपैंकी ही एक हायब्रिड जर्मन स्पोर्टस कार... या कारची किंमत २.३० करोड रुपये (मुंबई एक्स शोरुम) आहे... 


शाहरुख नव्या कोऱ्या गाडीसह

अशी आहे शाहरुखची 'BMW i8'...


- बीएमडब्ल्यू आय ८ ही गाडी २०१४ मध्ये लॉन्च करण्यात आली होती. 


- यामध्ये तीन सिलिंडरचे १.५ लीटर ट्विन टर्बो पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर आहे... जी ३५७ हॉर्स पॉवर देते. 


- ही कार केवळ ४.४ सेकंदात १०० किलोमीटरच्या स्पीडनं धावू शकते. या गाडीची टॉप स्पीड २५० किलोमीटर प्रति तास आहे. 


- डिझाईनमध्ये ही फ्युचरिस्टिक कारसारखी दिसते. 


- या स्पोर्टस कारच्या फाऊंडेशनसाठी कार्बन फायबर रिइनफोर्स्ड प्लास्टिक वापरलं गेलंय. 


- फ्रंट आणि बॅकचं वेट डिस्ट्रिब्युशन ५०:५० आहे. यामुळे या गाडीची हँन्डलिंग पॉवरफुल आहे. 


- मायलेजबद्दल म्हटलं तर ही गाडी १३ किलोमीटर प्रती लीटरचं मायलेज देते. इको मोड एनेबल करून या गाडीचं मायलेज वाढवलं जाऊ शकतं. यामध्ये पाच वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड दिलेले आहेत. 


- याशिवाय या गाडीत पार्किंग डिस्टंस कंट्रोल, क्रुज कंट्रोल सिस्टम, रेन सेन्सर, इंटेलिजंट इमर्जन्सी कॉल फंक्शन, ड्रायव्हर असिस्टंट पॅकेज, सराऊंडिंग आणि रिअर व्ह्यू कॅमेरा आणि पेडेस्ट्रियन रिकग्निशन ब्रेकिंग फंक्शनसारखे हायएन्ड फिचर्स दिले गेलेत.