नवी दिल्ली :  एडकॉम या आयटी कंपनीने केलेल्या एका धक्कादायक खुलाशाने फ्रीडम २५१ या जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन घेणाऱ्यांचे धाबे दणाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एडकॉमने सांगितले की रिंगिंग बेल्स या कंपनीला आम्ही प्रत्येक मोबाईल हॅंडसेट ३६०० रूपयांना विकला आहे.  आम्हांला माहिती नव्हते की या मोबाईलला कंपनी २५१ रूपयांना पुनःविक्री करेल. 


एडकॉमने सांगितले की नोएडातील रिंगिंग कंपनीच्या दाव्यांमुळे आमच्या कंपनीचे नाव खराब होत आहे. त्यामुळे आम्ही रिंगिंग बेलविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत. 
रिंगिंग बेल्सने २५१ रुपयात जो फोन देण्याचा दावा केला आहे. तो फोन एडक़मच्या आयकॉन ४ सारखाच आहे.. बाजारात पहिल्यापासून ३९९९ रुपयांत उपलब्ध आहे. 


एडकॉमचा संस्थापक आणि चेअरमन संजीव भाटीया म्हटले की, हे खऱे आहे की आम्ही रिंगिंग बेल या कंपनीला आमचे हँडसेट विकले. पण त्याची पुनःविक्री २५१ रुपयांना होईल हे माहिती नव्हते. आम्ही त्यांना ३६०० रुपयांना हा फोन विकला आहे.