COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : तु्म्ही लाजणारं झाड पाहिलं पाहिलं आहे, या झाडाला तुम्ही स्पर्श केला तरी हे झाडं लाजतं, याला लाजाळू झाड असंही म्हणतात. 
लाजाळू तिच्या त्वरित हालचालीमुळे ओळखली जाते. 


लाजाळू अशी का आहे हे अजून कळलेले नाही. अनेक शास्त्रज्ञांच्या मते स्वसंरक्षणासाठी ते झाड असे करते. जनावरांनी यास घाबरून झाडापासून दूर रहावे, अशी त्यामागची कल्पना असावी.


संध्याकाळी झाडाची पाने आपोआप दुमडतात आणि संपूर्ण पान खाली ओघळते. सूर्योदयास ती पुन्हा उघडतात आणि उभी होतात. स्पर्शाने या झाडाची पाने उत्तेजित होउन मिटतात. स्पर्श केलेल्या पानाच्या शेजारील पानासदेखील ही उत्तेजना झाडाद्वारे वितरित होते आणि तीदेखील मिटतात. 


ही हालचाल मुख्यतः पानातील टर्गर दाब कमी झाल्यामुळे होते असे आढळले आहे. टर्गर दाब हा कोषिकांच्या आतील द्रवामुळे आणि पाण्यामुळे कोषिकांच्या बाह्यावरणावर पडणारा जोर होय. तो जोर या झाडास सरळ उभे राहण्यास मदत करतो. परंतु तो दबाव जर उत्तेजनेमुळे बिघडला तर झाडांमधील रसायने आतील पाण्यास, ती कोषिका सोडण्यास बाध्य करतात. हा दबाव कमी झाल्यामुळे झाड गळल्यागत होते. Mimosaceae कुळांमधील झाडांमध्ये हा गुणधर्म असतो.