मुंबई : सोशल मीडियावर एखादं कुतूहल निर्माण करणारी गोष्ट आली की, नेटीझन्स ते कोड सोडवल्याशिवाय राहत नाहीत. सध्या सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होतो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याला कारणही तसेच आहे म्हणा, या फोटोमध्ये दडलाय एक विषारी साप आणि हाच साप शोधून दाखवायचा आहे. तसं काम आणि इतर टेन्शनं असतंच पण त्यातून थोडासा विरंगुळा म्हणून अनेक जण पालापाचोळ्यात लपलेल्या सापाला शोधण्याच्या प्रयत्न करत आहेत.


अजगरांच्या प्रजातीवर पीएचडी करणाऱ्या हेलेनने ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला. अभ्यास करताना तिला पालापाचोळ्यात दडलेला एक साप दिसला. हा साप पालापोचळ्याशी इतका काही एकरूप झाला, की कोणालाच तो सहजासहजी दिसू शकत नाही. 


तेव्हा त्याला शोधून काढण्याचे चॅलेन्ज तिने नेटिझन्सना दिले. आता अनेकांना याचे उत्तर डोकेफोड करूनही मिळाले नाही. तुमचेही असेच झाले आहे का? मग फार टेन्शन घ्यायची गरज नाही याचे उत्तर तसे आधीच शोधून ठेवले आहे.