२००० च्या नोटवर दिसतं पंतप्रधान मोदींचं भाषण
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यानंतर देशभरात खळबळ माजली. काळ्या पैशांवर केलेल्या या सर्जिकल स्ट्राईकनंतर देशभरात याचं अनेकांकडून स्वागत झालं तर विरोधक यावर टीका करत आहेत. २००० ची नवी नोट आल्यानंतर त्याची देखील खूप चर्चा झाली. त्याबाबत वेगवेगळ्या गोष्टी आणि चर्चा रंगू लागल्या.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यानंतर देशभरात खळबळ माजली. काळ्या पैशांवर केलेल्या या सर्जिकल स्ट्राईकनंतर देशभरात याचं अनेकांकडून स्वागत झालं तर विरोधक यावर टीका करत आहेत. २००० ची नवी नोट आल्यानंतर त्याची देखील खूप चर्चा झाली. त्याबाबत वेगवेगळ्या गोष्टी आणि चर्चा रंगू लागल्या.
पण जर २००० च्या नोटवर तुम्हाला पंतप्रधान मोदींचं भाषण ऐकू येऊ लागलं तर... विश्वास बसत नसेल पण हे खरंय. २ हजाराच्या नोटवर तुम्ही पंतप्रधान मोदींचं भाषण ऐकू शकणार आहात. मोदी की नोट हा अॅप डाऊनलोड केल्यानंतर तो ओपन करा आणि २००० च्या नोटवर तो धरा. २००० च्या नोटवर तुमचा स्मार्टफोन तुम्ही धरला की त्यावर पंतप्रधान मोदी यांचं भाषण सुरु होतो.
पाहा व्हिडिओ