नवी दिल्ली : परीक्षेआधीच १२वीचा गणिताचा पेपर फुटल्याचा दावा सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी केलाय. मात्र विद्यार्थ्यांचा हा आरोप शिक्षक आणि अधिकाऱ्यांनी फेटाळून लावलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी जो पेपर फुटला होता तो गणिताच्या पेपरसारखाच होता असं झारखंडमधील चक्रधरपूर येथील एका विद्यार्थ्याचे म्हणणे आहे. तसाच दिसणारा पेपर फोनवर आधीच आला होता असं त्या विद्यार्थ्याने सांगितलंय. 


शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा हा आरोप फेटाळून लावलाय. सीबीएसई परीक्षेआधी अशा प्रकारचे सॅम्पल प्रश्न विद्यार्थ्यांना दिले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना असे वाटले असेल. दिल्ली पब्लिक स्कूलमधील येथील विद्यार्थ्यांचेही हेच म्हणणे आहे. ९० टक्के प्रश्न हे सारखे होते. या दरम्यान,रांचीचे सीबीएसई समन्वयक मनोहर लाल यांनीही हा पेपर लीक झाला नव्हता असे सांगितले.