2016मध्येही सनी लिओनीच भारतीयांची आवड, दिवाळी-रमझानमध्ये मात्र नापसंती
2016मध्येही भारतातल्या इंटरनेट युजर्सनी सनी लिओनीला पसंती दिली आहे.
मुंबई : 2016मध्येही भारतातल्या इंटरनेट युजर्सनी सनी लिओनीला पसंती दिली आहे. असं असलं तरी दिवाळी आणि रमझानच्या काळामध्ये मात्र ही आकडेवारी 15 ते 17 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. सनी लिओनीनंतर मिया खलिफाला भारतीयांची पसंती मिळाली आहे.
पॉर्नहब या वेबसाईटनं 2016 सालची आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पॉर्न बघणाऱ्यांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. मागच्या वर्षी या यादीमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर होता. यंदा मात्र या यादीत अमेरिका पहिल्या, युके दुसऱ्या आणि कॅनडा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
2016 मध्ये भारतीयांचा टाईम ऑन साईट सरासरी 8 मिनीटं 20 सेकंद एवढा आहे. 2015च्या तुलनेमध्ये 70 सेकंदांनी ही घट झाली आहे. यंदा महिलांची पॉर्न बघण्याची संख्याही 2 टक्क्यांनी वाढली आहे. पॉर्न बघणाऱ्या भारतीयांपैकी 30 टक्के या महिला असल्याचंही या सर्वेक्षणात समोर आलं आहे.