नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात पुढील आठवड्यात व्हॉट्सअॅपवरील बंदीच्या मागणीसाठी दाखल कऱण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. व्हॉट्सअॅपच्या एंड-टू-एंट इंक्रिप्शन पॉलिसीबाबत हरयाणाचे आरटीआय कार्यकर्ता सुधीर यादव यांनी याचिका दाखल केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या एप्रिलपासून व्हॉट्सअॅपने प्रत्येक मेसेजला256-bit एनक्रिप्ट केलेय. ज्याला डीकोड केले जाऊ शकत नाही. जर व्हॉट्सअॅपकडून एखाद्या व्यक्तीचा डेटा सरकारने मागितले ते स्वत: या मेसेजना डिकोड करु शकत नाही. 


व्हॉट्सअॅपच्या या फीचरमुळे दहशतवादी आरामात व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून देशाला धोका पोहोचवणाऱ्या योजना बनवू शकतात. यामुळे देशाला नुकसान पोहोचू शकते,असे यादव यांनी याचिकेत म्हटलंय. तसेच 256-bit च्या मेसेजला डिकोड करण्यासाठी १००हून अधिक वर्षे लागतील. २९ जूनला या याचिकेवर सुनावणी होणार आहे.