नवी दिल्ली : सुझुकी मोटारसायकल इंडियानं आपली सुपरबाईक GSX-R1000 आणि 'GSX-R1000 आर'चं एक नवं व्हर्जन बाजारात लॉन्च केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीच्या शोरुममध्ये या सुपरबाईकची किंमत क्रमश: १९ लाख आणि २२ लाख रुपये आहे.


सुझुकी मोटार सायकल इंडिया लिमिटेडनं दिलेल्या माहितीनुसार, GSX-R1000 ला नव्या रुपात सादर करण्यात आलंय. यामध्ये अनेक नवीन फिचरही सामाविष्ट करण्यात आलेत. यातील इंजिनही नवीन आहे. तसंच GSX-R1000 आरमध्येही अनेक नवीन फिचर जोडले गेलेत.


कंपनीच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन दशकांत जगभरात या सीरिजच्या १० लाखांहून अधिक बाईक विकल्या गेल्यात.