मुंबई : तुम्हाला नुकताच जॉब इन्टरव्ह्यूसाठी फोन आलाय का? तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना की नेमकं मुलाखतीसाठी कसं तयार व्हायचं, कस वागायचं आणि काय बोलायचं...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलाखतीच्या वेळी टाळा या गोष्टी टाळा...


१. रोजच्या वापरातले सैल कपडे घालणे
रोज जीन्स, थ्री-फोर्थ घालायला तुम्हाला आवडत असेल. अगदी त्यातच तुम्हाला आरामदायकही वाटत असेल. पण मुलाखतीला असे कपडे घालून जाणे योग्य दिसणार नाही. तुम्ही काय कपडे घालता? हेच तुमचं पहिल इम्प्रेशन असतं... लक्षात ठेवा 'युअर फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन'... शक्यतो फॉर्मल कपडे घाला.
 
२. अलंकार
तुम्ही नोकरीकरता मुलाखतीला जात आहात कोणत्याही समारंभाला नाही. त्यामुळे मोठ्ठाले दागिने घालणं, खूप मोठी टिकली लावणं, मोठे कानातले घालणं, भडक रंगाचे दागिने घालणं अशा गोष्टी टाळलेल्याच बऱ्या...
 
३. योग्य कपडे घाला
मुलाखतीला जाताना हे लक्षात ठेवा की हा कोणता फॅशन शो नाही. त्यामुळे तुमचे शरीर झाकले जाईल असे योग्य कपडे घाला. त्यामुळे तुम्हालाही मुलाखतीच्या वेळी अशा कपड्यांमुळे अस्वस्थ किंवा अवघडल्यासारखं वाटणार नाही.
 
४. हावभाव

अगदी पहिलीच मुलाखत असेल तर कदाचित तुम्ही थोड्या बिचकलेल्या अवस्थेत असाल किंवा तुम्हाला मुळातच मुलाखतीची भीती वाटत असेल... पण, तसे समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येणार नाही, याची काळजी घ्या. तुमच्यात आत्मविश्वास नाही असं समोरच्या व्यक्तीला वाटलं तर टॅलेंट असूनही हातची नोकरी जाऊ शकते.
 
५. खोटी माहिती
मुलाखतीच्या वेळी तुमचा बायोडेटा किंवा रेझ्युम विचारला जाईल... अशा वेळी तुम्ही खोटी माहिती देणे तुम्हाला पुढे महागात पडू शकते. खोटी माहिती देऊन तुमची निवड होईल पण काम करण्याच्या वेळी खरं काय ते उघडकीस येईलच. सगळ्यांसमोर आपले पितळ उघडे पडलेलं कदाचित तुम्हालाच सहन होणार नाही.
 
६. वैयक्तिक बोलणं किंवा सुट्ट्यांबाबत विचारणे
मुलाखती दरम्यान चुकूनही वैयक्तिक, खाजगी विषयांवर बोलू नका. तुम्ही तिथेच रिजेक्ट होऊ शकता. तसेच मुलाखतीतच मला सुट्ट्या किती मिळणार? किंवा मी किती सुट्ट्या घेऊ शकतो? हे विचारणं टाळा.