पीट्सबर्ग :  गुगलच्या ड्रायव्हर लेस कारची टेस्टींग सुरू असताना आता जगात टॅक्सी क्षेत्रात सर्वात मोठी कंपनी असलेल्या उबेरच्या विना ड्रायव्हरची यशस्वी चाचणी झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उबेरच्या या टॅक्सीमध्ये एकूण २० हाय डेफिनेशन कॅमेरे आहेत. तसेच एक लेझर सेन्सर आहेत. त्याद्वारे ऑटोमोडवर ही कार चालते. या कारच्या कॅमेऱ्यात कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. त्यामुळे ट्रॅफिक, ट्रॅफिक सिग्नल यांचा अचूक अंदाज यात घेतला जातो. 


ही कार दोन मोडवर चालते एक ऑटो मोड आणि एक मॅन्युअल मोड... ऑटोमोडमध्ये ड्रायव्हिंग सीटवर माणूस बसलेला असेल पण गाडी सेन्सर आणि कॅमेऱ्याच्या मदतीने चालते. तर सेफ्टीसाठी स्टेरिंगवर असेल माणूस सर्व कंट्रोल आपल्या हातात घेऊ शकतो. मॅन्युअल मोडमध्ये चालक स्वतः गाडी चालू शकतो. 


मागील सीटवर एक आयपॅड असून त्यात तुम्ही गाडी कशी चालली आहे हे पाहू शकतात. तसेच सेल्फीही काढू शकतात. तसेच समोर एक आयपॅड असून त्यात गाडीसमोरचे अडथळे आणि इतर गोष्टी तसेच गाडीचा रूट दिसतो. 


या गाडीचा व्हिडिओ पाहा...