मुंबई :  देशातील सर्वात स्वस्त कार देणाऱ्या टाटा मोटर्सने लवकरच भारतासाठी सर्वात फायदेशील कार देण्याचा निर्धार केला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत असताना सर्वसामान्यांना परवणारी कार टाटा मेगापिक्सल  टाटा मोटर्स बाजारात घेऊन येणार आहे. ही टाटा नॅनोचे अपग्रेड मॉडेल आहे त्यातील युनिक कॉम्बिनेशनमुळे ही कार १ लीटरला १०० किलोमीटरपर्यंत धावू शकते. 


कुठे दिसली ही पहिल्यांदा कार... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाटा मेगापिक्सल ही कार टाटा नॅनोसोबत बाजारात आणण्यात येणार आहे. ही कार एक लीटर पेट्रोल १०० किलोमीटर (बॅटरी ऑन्ली पॉवर) चा मायलेज देऊ शकते. या मायलेजमुळे तिचे इंजिन दमदार असेल याचा भरवसा देणे थोडे मुश्किल होणार आहे. 


ही ऑटो सेक्शनमध्ये आतापर्यंतच्या सर्वात अँडव्हान्स टेक्नॉलिजीने बनविण्यात आलेली कार आहे. या कारची किंमत ५ ते ६ लाख रुपये असू शकते. टाटा  मेगापिक्सलला ८२ व्या जिनेवा मोटर शोमध्ये पहिल्यांदा दाखविण्यात आली. ही २०१७ पर्यंत भारतीय बाजारात दाखल होणार आहे. 



काय आहे अँडव्हान्स या कारमध्ये 


ही टाटा मेगापिक्सल पेट्रोलने नाही तर बॅटरीने चालणारी कार आहे.  या कारला थांबू चार्ज करण्याची गरज नाही. ही बॅटरी चालता चालता चार्ज होते. 


टाटा मेगापिक्सल लीथियम आयन फॉस्फेटची बॅटरी लावण्यात आली. पेट्रोल इंजीन जनरेटर कार चालताना चार्ज होते. पेट्रोल इंजि जनरेटर खूप कमी फ्युअलल कन्झूम करते. त्यामुळे कारचा मायलेज फक्त पेट्रोलवर सिमीत होतो. 


काय आहे स्पेसिफिकेशन 


या कारमध्ये १ किलो वॅटची लिथियम बॅटरी आहे. या कारच्या इंजिनची पॉवर 325 cc आणि टॉप स्पीट ११० kmph आहे. या कारची लांबी ३५०५ एमएम आहे. तर रुंदी १६७३ एमएम आणि उंची १४०५ एमएम आहे. कारमध्ये १३.५ hp चा इंजिनन आहे. जे ५०० nm टॉर्क जनरेट करते. ही कार ३० मिनिटात ८० टक्के चार्ज होते.