मुंबई : कॉलेजमध्ये आल्यावर अनेकांचे खर्च वाढतात. हा खर्च कधी अभ्यासाचा असतो तर अनेकदा हा खर्च मजा मस्तीसाठी असतो. पण, हे खर्च जर स्वतःचे स्वतः भागवायचे असतील तर मात्र त्यासाठी तुमच्याकडे काही पर्याय उपलब्ध आहेत. त्यासाठी तुम्ही काही पार्ट टाइम जॉब्स करू शकता. यातून तुम्हाला कदाचित एखादी चांगली नोकरीही मिळू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. कन्टेंट एडिटर
वाढत्या कॉर्पोरेट सेक्टरला आजकाल त्यांचा डेटा एडिट करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांची गरज असते. त्यासाठी त्यांना कन्टेंट एडिटर हवे असतात. इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला दिवसाला काही तासांसाठी कन्टेंट एडिटिंगचे अनेक जॉब्स मिळू शकतात. तुमचा एखाद्या भाषेवर प्रभाव असेल तर हा जॉब तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो.


२. ऑनलाईन रीसर्चर
अनेक जण या कामाला कंटाळवाणे मानतात. पण, तुम्हाला जर रीसर्च करण्यात रस असेल तर हा जॉब तुमच्यासाठी चांगला आहे. बिझनेस हाऊस, मीडिया हाऊस यांच्याकडे अशा प्रकारचे अनेक जॉब्स असतात. या कामासाठी बऱ्यापैकी चांगले पैसे मिळतात.


३. गेस्ट सर्व्हिस कॉर्डिनेटर
पर्यटन क्षेत्रात या प्रकारचे जॉब्स मिळू शकतात. क्लायंट्ससोबत डील करण्यासाठी किंवा त्यांना असलेल्या काही समस्यांचे निराकरण करण्यासाठी अशा प्रकारचे जॉब्स तुम्हाला मिळू शकतात. यामुळे पैशांसोबत आत्मविश्वासही वाढू शकतो.


४. सोशल मीडिया असिस्टंट
आजकाल प्रत्येक कंपनीला सोशल मीडियावर आपलं स्थान मजबूत करावं लागतं. त्यामुळेच त्यांना जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचता येतं. या कामासाठी त्यांना माणसांची गरज असते. यात तुम्हाला एखाद्या कंपनीचे सोशल मीडिया अकाऊंट सांभाळावे लागतात किंवा त्यासाठी चांगल्या कन्टेंटची निर्मिती करावी लागते.


५. ऑनलाईन कम्युनिकेशन असोसिएट
हे एक नवीन फिल्ड आहे. यात सोशल मीडिया असिस्टंटच्या कामाचा समावेश असतोच. शिवाय, कंटेंटचा एक रिपोर्ट तयार करुन त्याचं विश्लेषणही करावं लागतं. या कामासाठी मिळणारे पैसे इतर कामांपेक्षा बरेच जास्त असतात.