मुंबई : प्रेम हे नेहमी विश्वासावर टिकतं. जिथे विश्वास नसतो तिथे कधीही प्रेम टिकत नाही. यामुळे नात्यात दुरावा येतो त्याचे पर्यवसन ब्रेकअपमध्ये होते. ब्रेकअप झाल्यानंतरच्या त्या स्थितीतून बाहेर पडणे सगळ्यांनाच शक्य होते असे नाही. अशात मुले ब्रेकअप झाल्यानंतर ड्रिंक करण्यास सुरुवात करतात. मात्र ब्रेकअप झाल्यानंतर मुली काय करतात हे तुम्हाला माहीत आहे का? घ्या जाणून


१. ब्रेकअप झाल्यानंतर मुली सोशल मीडियावर जाऊन सतत एक्स बॉयफ्रेंडचे फोटो पाहतात.
२. मुली एक्स बॉयफ्रेंडशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतात.
३. प्रेमात असताना सर्व गोष्टी छान दिसतात. मात्र ब्रेकअप झाल्यानंतर त्यांच्या जीवनात उदासीनता येते.
४.ब्रेकअप झाल्यानंतर मुली जुने फोटो पाहणे.जुने मेसेज वाचत राहतात.
५. ब्रेकअप झाल्यानंतर मुली प्रेमाला निरर्थक गोष्ट समजतात. 
६. इमोशनल गाणी ऐकतात.
७. ब्रेकअप विसरता यावा म्हणून शॉपिंग करतात.