ब्रेकअप करण्याआधी करा या पाच गोष्टींचा विचार
आजकाल रिलेशनशीपपेक्षा ब्रेकअपचेच किस्से जास्त कानावर पडतात. बदलत्या पिढीप्रमाणे रिलेशनशीपची संकल्पनादेखील बदलत चालली आहे. जर तुमचा पार्टनरही ब्रेकअपचा विचार करत असेल तर तुम्ही ते होऊन देऊ नका. काहीही कारण नसतांना तुमच्या फुलणाऱ्या नात्याचा असा शेवट होऊ देऊ नका.
मुंबई : आजकाल रिलेशनशीपपेक्षा ब्रेकअपचेच किस्से जास्त कानावर पडतात. बदलत्या पिढीप्रमाणे रिलेशनशीपची संकल्पनादेखील बदलत चालली आहे. जर तुमचा पार्टनरही ब्रेकअपचा विचार करत असेल तर तुम्ही ते होऊन देऊ नका. काहीही कारण नसतांना तुमच्या फुलणाऱ्या नात्याचा असा शेवट होऊ देऊ नका.
जर ब्रेकअप करत असाल तर आधी या पाच गोष्टींचा विचार करा
१. ती/तो तुम्हाला वेळ देत नाहीये का ?
रोजच्या रूटीनमधून एकमेकांना वेळ द्या. तुम्ही एकमेकांना वेळ दिला, तरच तुम्ही एकमेकांच्या जास्त जवळ याल. जर तुमचा पार्टनर तुम्हाला वेळ देत असेल तर तुम्ही नशीबवान आहात. असा जोडीदार सोडू नका.
२. ती/तो तुमचा आदर करत नाही का ?
तुमच्या जोडीदाराने तुमचा, तुमचे कामाचा, तुमच्या नातेवाईकांचा आदर करणे गरजेचे आहे. जर तुमचा पार्टनरला या तिन्ही गोष्टींचा आदर आहे, तर त्याला सोडू नका. अशा व्यक्ती फार कमी असतात.
३. ती/तो तुम्हाला धोका देतेय का ?
कोणत्याही नात्याचा पाया असतो तो म्हणजे विश्वास. जर तुमचा पार्टनर त्याच्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत असेल. तुमच्यापासून काही लपवत नसेल तर तुम्ही ब्रेकअप करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करा.
४. तुमचा मानसिक तणाव
तुम्ही कोणत्या मानसिक तणावाखाली आहात का? अनेकदा हा मानसिक तणावच तुमचे नाते बिघडण्याचे कारण ठरते. तुमची चिडचिड, ताण, राग तुमचा पार्टनर सहन करत असेल. तुमच्यावर उलट चिडत नसेल तर अशा जोडीदार गमवू नका. असा जोडीदार मिळायला नशिब लागते.
५. तुम्ही कोणा दुसऱ्याबद्दल तर नाहीना विचार करत आहात
कधीकधी काही खटके उडाल्यानंतर आपण दुसऱ्या व्यक्तीचा विचार करायला लागतो. काही वेळेला जोडीदाराचा स्वभाव समजत नाही. तर कधीकधी आवडी-निवडी जुळत नाहीत. मात्र हे लक्षात ठेवा की कायम उलट स्वभावाची माणसेच एकमेकांना आकर्षित होतात.