मुंबई : शीफ्ट ड्युटी, कामाचा ताण, अनियमीत आहार या सगळ्याचा तुमच्या वजनावर नक्कीच परिणाम होत असेल. वजन कमी करण्यासाठी तुम्ही अनेकदा डायटीशन, योगा किंवा वेगवेगळे व्यायाम केले असतील. पण तुम्हाला माहितेय का की तुमच्या स्मार्टफोनमधील एक अॅपसुद्धा तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करेल ते?

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैज्ञानिकांनी एक असे अॅप तयार केले आहे जे तुमच्या प्रत्येक आहारात किती कॅलरीज असतात हे सांगते. या अॅपचे नाव लार्क चॅट असे आहे. हे अॅप प्रत्येक पदार्थात कोणते घटक असतात, त्यांचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो ह्याचे विश्लेषण करून सांगते. हे अॅप्लिकेशन मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील वैज्ञानिकांनी तयार केले आहे.

एका युजरने शेअर केलेला अनुभव

या अॅप्लिकेशनमध्ये तुम्ही तुमच्या आहाराबाबत बोलूनही सांगू शकता, त्यामुळे हे अॅप युजर फ्रेंडली आहे. मी नाश्त्याला वाटीभर ओट्स, एक केळ, आणि एक ग्लास संत्र्याचा ज्यूस घेतो. पण जेव्हा मी हे अॅपवर माझ्या आहाराविषयी बघितले तेव्हा माझ्या या आहारात जास्त कॅलरीज असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता मी फक्त अर्धे केळ खातो.