मुंबई : पावसापासून स्मार्टफोनचा बचाव करण्यासाठी आपण विविध आयडिया वापरतो. मात्र पावसाळ्यात जर नवीन फोन घ्यायचाच असेल तर वॉटर रेझिस्टंट स्मार्टफोनला अधिक पसंती मिळते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॅमसंग गॅलॅक्सी एस७ - या वॉटर रेझिस्टंट स्मार्टफोनची किंमत ४८ हजार ९९९ रुपये इतकी आहे. ३० मिनिटे हा स्मार्टफोन पाण्यात राहिल्यानंतरही फोन सुस्थितीत राहील.


सॅमसंग गॅलॅक्सी एस७ एज - या स्मार्टफोनची किंमत ५१ हजार ५०० रुपये इतकी आहे. 


मोटोरोला मोटो जी४ - हा स्मार्टफोन वॉटर रेझिस्टंट असून या स्मार्टफोनची किंमत आहे १२ हजार ४९९ रुपये.


मोटोरोला मोटो जी४ प्लस - मोटोरोला मोटोरोला मोटो जी४ प्रमाणेच हा स्मार्टफोनही वॉटर रेझिस्टंट आहे. या स्मार्टफोनची किंमत १३ हजार ४९९ इतकी आहे.


सोनी एक्सपिरिया एक्स - सोनीचा हा स्मार्टफोन वॉटर रेझिस्टंट असून या स्मार्टफोनची किंमत ४८ हजार ९९० रुपये इतकी आहे.