मुंबई : सकाळी उठून तुमचा बेड सोडता तेव्हा जितका त्रास तुम्हाला होत असेल तितका त्रास दिवसभरात कोणतंही काम करताना साहजिकच होत असेल. पण, या झोपण्याचेच कोणी तुम्हाला पैसे दिले तर? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हो, शक्य आहे. कारण, बंगळुरूमध्ये सुरू झालेल्या एका स्टार्टअपने असा एक प्रकारचा जॉब ऑफर केला आहे. अर्बन लॅडर नावाच्या एका कंपनीने लोकांना या कंपनीने तयार केलेल्या गाद्यांची चाचपणी करण्यासाठी पैसे देण्याची तयारी दर्शवलीये. 'सिनियर मॅट्रेस टेस्टर' असं या पदाचं नाव आहे. 


एखाद्या आळशी आणि झोपणाऱ्या व्यक्तीची या कामासाठी गरज आहे, असं या कंपनीने म्हटलं आहे. तुम्हाला इतकंच करायचंय की या गादीवर झोपल्यावर तुम्हाला किती कम्फर्टेबल वाटतं याची माहिती कंपनीला द्यायची. जसं की एखादा विशिष्ट पदार्थ खाऊन गादीवर झोपल्यावर किंवा कॉफी पिऊन झोपल्यावर कसं वेगवेगळं वाटतं, याची माहिती कंपनीला द्यायची. 


आता ही स्वप्नातली नोकरी खरंच आहे की शुक्रवारी असलेल्या १ एप्रिलसाठी हे 'एप्रिल फूल' प्रकरण आहे, याची इंटरनेटवर चर्चा सुरू आहे.