मुंबई : सोशल मीडियामध्ये आघाडीवर आणि तरुणांना पसंतीस पडलेल्या व्हॉट्सअॅपवर आता नवी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेय. व्हॉट्सअॅपचे अॅप्लिकेशन न उघडता फक्त मोबाईलच्या स्क्रीनवरूनच ‘कॉल बॅक’ करणे शक्य आहे. 


व्हॉइस कॉल सुविधा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅपलच्या आयओएस आणि अँड्रॉइड मोबाईलवर  ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे स्मार्टफोनधारकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. तसेच याचा फायदा व्हॉट्सअॅपची व्हॉइस कॉल सुविधेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना होणार आहे.


मोबाईलच्या स्क्रीनवर सुविधा


याआधी कॉल करण्यासाठी व्हाट्सअॅप ओपन करावे लागत होते. आता तसे न करता मोबाईलच्या स्क्रीनवर ही सुविधा मिळणार आहे. नेहमीच्या कॉलिंगप्रमाणे व्हॉट्सअॅप कॉलचेही नोटिफिकेशन ठाकाणी त्याच्या बाजूलाच कॉलबॅकचे बटन दिले जाणार आहे. 


लवकरच व्हॉईस मेल


याबाबत फोन रडार या संकेतस्थळाने ही बातमी दिलेय. तसेच, अॅपलच्या वापरकर्त्यांसाठी व्हॉईस मेलची सुविधाही सुरू होण्याची शक्यताही या संकेतस्थळाने वर्तविलेय.