मुंबई : बारावीची परीक्षा आजपासून सुरु झालीय.काही दिवसांनी दहावीची परीक्षा सुरु होईल. मुलांचा अभ्यासही झाला असेल मात्र अनेकदा परीक्षेच्या तणावामुळे अभ्यास करुनही मुलांना टेन्शन येते. मग रात्रभर मुले परीक्षेच्या अभ्यास करत राहतात. त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी मात्र पेपरवर होतो. यासाठी तज्ञांनी मुलांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालकांसाठी या आहेत टिप्स
परीक्षेदरम्यान मुलांसमोर भूतकाळात घडलेल्या कोणत्याही घटनेबद्दल बोलून त्यांना निराश करु नका. 
आपल्या मुलाला चांगली झोप आणि पौष्टिक जेवण देण्यावर अधिक भर द्या.
परीक्षेदरम्यान मुलांसोबत राहा. त्याला मानसिक आधार द्या.
शाळेतील परीक्षांतील गुणांवरुन पॅनिक होऊ नका. परीक्षेवर तो अधिक लक्ष कसे केंद्रित करु शकेल याबाबत त्याला मदत करा.



मुलांसाठी या आहेत टिप्स
एकाच विषयासाठी खूप जास्त वेळ देऊ नका.
शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी ध्यानात ठेवून त्याप्रमाणे कृती करा.
अभ्यासादरम्यान लहान ब्रेक घेत जा. मात्र त्याचबरोबर हा ब्रेक मोठाही होणार नाही याकडे लक्ष द्या.
तुम्हाला किती मार्क मिळतील याचा विचार करण्यापेक्षा पेपर कसा सोडवायचा आहे याकडे लक्ष केंद्रित करा.
ज्यांच्याशी बोलून तुम्हाला सकारात्मक उर्जा मिळते अशा लोकांशी संवाद साधा.