हँडसम दिसायचेय तर वापरा या टिप्स
मुलींना तयार व्हायला नेहमीच वेळ लागतो. तासनतास त्या मेकअप करण्यात घालवतात. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का केवळ मुलीच नाही तर मुलंही याबाबतीत मागे नाहीत.
मुंबई : मुलींना तयार व्हायला नेहमीच वेळ लागतो. तासनतास त्या मेकअप करण्यात घालवतात. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का केवळ मुलीच नाही तर मुलंही याबाबतीत मागे नाहीत. लग्न असो वा पार्टी, नाहीतर गर्लफ्रेंडला भेटायला जायचे असेल तर हँडसम दिसण्यासाठी अनेक क्लुप्त्या वापरतात. हँडसम तसेच गुडलुकिंग मुले मुलींना पाहिल्याक्षणी भावतात.
तुम्हालाही हँडसम दिसायचेय. या टिप्स वापरा.
ड्रेसिंग सेन्सवर ध्यान - अनेकदा मुले त्यांच्या कपड्यांबाबत जास्त काळजी घेत नाहीत. जे हाताला मिळेल ते घालतात आणि निघतात. मात्र कोणत्याही स्पेशल ठिकाणी जायचे असल्याच योग्य रंगाचे तसेच तुम्हाला चांगले दिसतील असे कपडे निवडा.
फेसवॉशचा करा वापर - दिवसभर बाहेर राहिल्याने चेहऱ्यावर धूळ जमा होते. केवळ पाण्याने अथवा साबणाने चेहरा स्वच्छ होत नाही. साबण लावल्याने चेहरा कोरडा होतो. त्यामुळे त्याच्याऐवजी फेसवॉशचा वापर करा. यामुळे चेहऱ्यातील ओलावा कायम राहील.
क्लीन शेव्ह - अनेक मुलींना क्लीन शेव्ह असलेली मुलं आवडतात. त्यामुळे शेव्हिंगबाबतची स्वच्छता पाळा. दाढी ठेवल्यास त्याबाबत नेहमी स्वच्छता पाळा.