नवी दिल्ली : भारतात शेणाचा वापर केवळ गोवऱ्या आणि गोबर गॅससाठी केला जातो. मात्र एका कार कंपनीने चक्क कार चालवण्यासाठीच शेणाचा वापर केलाय. ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल ना? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२० वर्षाच्या रिसर्चनंतर ही कार बनवण्यात आलीये. ही कार मिराई मॉस प्रॉडक्शन पॉवर फ्यूअल सेल कार आहे. २० वर्षाचा रिसर्च आणि लाखो डॉलरच्या खर्चानंतर ही कार बनवण्यात आलीये. 


कारमध्ये हायड्रोजन फ्यूअल स्टीकच्या मदतीने गॅस जातो आणि हायड्रोजनसोबत ऑक्सिजन गॅसचे मिश्रण होते. या संपूर्ण प्रोसेसमुळे ऑन बोर्ड बॅटरी चार्ज करण्यासाठी आवश्यक वीज निर्माण होते. यात ११४ किलोवॅटचे फ्युअल स्टिक आणि ११३ किलोवॅटची इलेक्ट्रिक मोटार बसवण्यात आली आहे. जपानमध्ये या कारची किंमत साधारण ३५ लाख रुपयांपर्यंत आहे.