नको असलेले कॉल्स टाळण्यासाठी सोप्पा उपाय...
तुम्हाला नको असलेले कॉल आणि मॅसेज जर तुम्हाला त्रासदायक ठरत असतील, तर आता स्वत:ला फारसा त्रास करून घेऊ नका.
मुंबई : तुम्हाला नको असलेले कॉल आणि मॅसेज जर तुम्हाला त्रासदायक ठरत असतील, तर आता स्वत:ला फारसा त्रास करून घेऊ नका.
कारण, आता टेलिकॉम रेग्युलेटर अॅथॉरिटी अर्थात ट्रायनं एक असं मोबाईल अॅप लॉन्च केलंय जे डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला नको असलेले कॉल्स तुम्ही टाळू शकता. या अॅपचं नाव आहे 'Do Not Call Services'.
शिवाय याबद्दल तुम्ही तुमची तक्रारही नोंदवू शकता. इतकंच नाही तर तुमच्या तक्रारीवर कारवाई करण्यात आली किंवा नाही हेदेखील तुम्हाला या अॅपवरच कळू शकेल.
गूगल प्ले स्टोअरवरून हे अॅप्लिकेशन तुम्ही डाऊनलोड करू शकता. सध्या तरी हे अॅप केवळ अॅन्ड्रॉईड यूजर्स वापरू शकतील. लवकरच ते ios वरही उपलब्ध होईल.
आत्तापर्यंत नको असलेले कॉल्स टाळण्यासाठी आणि तक्रार नोंदवण्यासाठी केवळ १९०९ हा क्रमांक उपलब्ध होता.