मुंबई : तुम्ही जर एखाद्या मुलीच्या प्रेमात पडला आहात पण, तिला मात्र अद्याप हे सांगितलेलं नाहीय... तिचं हृदय, तिचं प्रेम जिंकण्याच्या तुम्ही प्रयत्नात आहात... तर तुमच्यासाठीच आहेत या १० सहज-सोप्या टिप्स... 


स्मार्ट लूक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्मार्ट दिसण्यासाठी महागडे कपडे हवे असतात, असा जर तुमचा समज असेल तर तुम्ही चूक आहात... स्वच्छ आणि निटनेटक्या अशा अत्यंत साध्या कपड्यांतही तुम्ही स्मार्ट दिसता... स्वत:ला चांगल्या पद्धतीनं कॅरी करणारे पुरुष मुलींना सहज भावतात. 


सभ्यता आणि आदर बाळगा


इतरांबद्दल सभ्यता आणि आदर बाळगणारे लोक सहज इतरांच्या मनात शिरू शकतात. दिखावूपणा आणि नाटकीपणा न करता सहजपणे इतरांना आपलंसं करा.


तिच्या डोळ्यांत पाहून बोला


नजर चोरणं हा आत्मविश्वास कमी असण्याचं एक चिन्हं आहे. तेव्हा तिच्याशी बोलताना इकडे - तिकडे न पाहता तिच्या डोळ्यांत डोळे घालून बोला. त्यामुळे, ती जशी आहे तशी तुम्हाला आणि तुम्ही आहात तसे तिला कळायला मदत होईल. 


तिला वेगळ्या पद्धतीनं पण समानतेनं वागवा


स्त्रिया आणि पुरुष यांच्यात समानता असणं गरजेचं आहे... नेहमी लक्षात ठेवा मुलगा आणि मुलगी समान असतात पण तरीही वेगवेगळ्या पद्धतीनं... नैसर्गिकरित्या त्यांच्यात शारिरिक, शब्दश: फरक असला तरी त्यांच्यात एक दुवा असतो. तुम्ही जसं तुमच्या पुरुष मित्रांशी वागता अगदी तसंच तुम्ही तुमच्या महिला मित्रांशी प्रत्येक वेळी वागू शकत नाही. 


इतरांबद्दल वाईट बोलणं टाळा


इतरांबद्दल वाईट आणि आक्षेपार्ह बोलणारी लोक कुठेतरी खटकतात. मुलींनाही हे आवडत नाही. तुमच्या पुरुष मित्रांशी बोलताना तुम्ही जरी प्रेमात शिव्या घालत असाल तरी मुलींसमोर ही भाषा वापरताना जरा सावधान... 


संभाषण साधा


ती जेव्हा तुमच्याशी बोलत असेल तेव्हा तुम्ही तिला आणखी उघडपणे बोलण्यासाठी मदत होईल अशा पद्धतीनं तिच्याशी संवाद साधा... केवळ तिचंच ऐकत बसणं किंवा केवळ आपणच बोलत राहणं यामुळे ती लवकर बोअर होऊ शकते. तिच्याशी संवाद ठेवा पण इतकाही नाही की त्यामुळे ती असहज होईल. 


भावनिकरित्या तिच्यासाठी तयार राहा


एखाद्या व्यक्तीला आपलसं करण्यासाठी त्या व्यक्तीशी भावनिकरित्या कनेक्ट राहणं खूप गरजेचं असतं. एखाद्या कठिण प्रसंगी तिच्यासोबत उभे राहा... ती एकटी नाही, हे तुम्ही न बोलताही तिला सांगू शकता. .


तिला सांगा, ती आहे तशी चांगली आहे


तिच्या जमेच्या बाजुंबद्दल तिला अवगत करून द्या... त्यासाठी ती तुम्हाला प्रेरणा देते, हे तिला शब्दांत सांगताना कधीही बुजरेपणा करू नका. तिच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे तुमचं लक्ष असतं आणि त्या तुम्हाला आवडतात, हे नक्कीच तिच्या नजरेतूनही सुटणार नाही. 


सेक्सबद्दल संभाषण टाळा


केवळ सेक्सबद्दल स्त्रिया विचार करत नाहीत... त्यामागे भावना महत्त्वाच्या असतात. तुम्ही तिचं मन जिंकेपर्यंत तिच्याशी सेक्सबद्दल बोलणंही टाळा... तिचा जेव्हा तुमच्यावर विश्वास बसेल आणि ती तुमच्याशी सहजपणे बोलणं सुरू करेल त्यावेळी तुम्ही या विषयावर तिच्याशी बोलू शकाल. 


प्रामाणिक राहा


तुमच्या स्वत:च्या क्षमतेबद्दल प्रामाणिक राहा... उगाचच तुझ्यासाठी चंद्र, तारे तोडून आणू शकेन असे फिल्मी डायलॉग मारायला जाऊ नकाल. तुम्ही पाय नेहमी जमिनीवर आहेत, हे तिला दाखवून द्या. कोणत्याही भौतिक गोष्टी असल्या - नसल्या तरी तुम्ही तिला नेहमी खूश ठेऊ शकाल, याबद्दलची खात्री तिच्या मनात निर्माण करा. खोटी वचनं देणं टाळा.