ट्विटरचे यूझर्स हिरमुसले!
ट्विटरवर पोस्ट करताना अक्षरांची सीमा वाढवण्यात येणार असल्याची बातमी नुकतीच आली होती. परंतु, ट्विटरचे सीईओ जॅक डोरसे यांनी शुक्रवारी मात्र हा दावा फेटाळून लावलाय.
मुंबई : ट्विटरवर पोस्ट करताना अक्षरांची सीमा वाढवण्यात येणार असल्याची बातमी नुकतीच आली होती. परंतु, ट्विटरचे सीईओ जॅक डोरसे यांनी शुक्रवारी मात्र हा दावा फेटाळून लावलाय.
ट्विटर आपल्या पोस्टची सीमा वाढवून १४० अक्षरांऐवजी १० हजार अक्षर करणार असल्याचं एका वेबसाईटनं म्हटलं होतं. परंतु, डोरसे यांच्या म्हणण्यानुसार, असा कोणताही निर्णय ट्विटरने घेतलेला नाही.
येत्या सोमवारी ट्विटरला १० वर्ष पूर्ण होणार आहेत. परंतु, कुठेतरी इतर सोशल वेबसाईटस आणि मायक्रो ब्लॉगिंग साईटच्या तुलनेत ट्विटर मागेच पडलं असं म्हणावं लागेल.
सध्या, ट्विटरवर अनेक सेलिब्रिटी दाखल झालेले आहेत. आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांच्यासाठी हे खूप सहज आणि सोप्पं झालंय ते ट्विटरमुळेच... गेल्या वर्षाच्या शेवटपर्यंत ट्विटरच्या यूझर्सची संख्या होती ३२ करोड तर प्रतिस्पर्धी फेसबुकच्या यूझर्सची संख्या होती १५९ करोड...