मुंबई : व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. व्हॉट्सअॅप लवकरच म्यूझिक शेअरिंग आणि मोठ्या इमोजींचं नवं फिचर घेऊन येत आहे. याआधीच व्हॉट्सअॅपनं ग्रुप मेंशन फिचर आणि ग्रुप लिंक इनव्हाईटनंतर आता ही नवी दोन फिचर लवकरच व्हॉट्सअॅपमध्ये येणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्यूझिक फिचरमध्ये यूजर्स मित्रांना गाणी पाठवू शकतील आणि ही गाणी अॅपल म्यूझिकलाही लिंक करू शकती. ऑडिओ फाईलच्या ऑप्शनमध्ये सध्या ही सुविधा उपलब्ध नाही. तसंच या नव्या फिचरमध्ये अॅपल ओएस 10 मध्ये मोठ्या इमोजींना खास जागा देण्यात आली आहे. हे नवे इमोजी जुन्या इमोजींच्या तुलनेत तीन पट मोठे असणार आहेत.