५० हजारांत करु शकता या देशांची सफर
जगाची सफर करण्याचे अनेकांची आवड असते मात्र पैशामुळे ही आवड स्वप्न बनून राहते. मात्र आता निराश होण्याची गरज नाही. जगात असे काही देश आहेत ज्या देशांची सफर तुम्ही अवघ्या ५० हजार रुपयांत करु शकता.
नवी दिल्ली : जगाची सफर करण्याचे अनेकांची आवड असते मात्र पैशामुळे ही आवड स्वप्न बनून राहते. मात्र आता निराश होण्याची गरज नाही. जगात असे काही देश आहेत ज्या देशांची सफर तुम्ही अवघ्या ५० हजार रुपयांत करु शकता.
इजिप्त : जर तुम्ही इजिप्तला जाण्यासाठी विमानाचे तिकीट बुकिंग ५ ते सहा महिने आधी करता तर राउंड ट्रिपसाठी २४ हजार रुपये लागतील. या देशात राहण्यासाठी अनेक पर्याय आहेत. येथे राहण्यासाठी एका रात्रीचे हॉस्टेलचे कमीत कमी भाडे ४०० रुपये आहे. इजिप्त फिरण्यासाठी कमीत कमी पाच दिवसांची ट्रिप असली पाहिजे. येथे गीझाचे पिरॅमिड्स, रेड सी अशी अनेक स्थळे आहेत.
केनिया : यासाठी तिकीट ४ ते सहा महिने आधी बुक केल्यास राउंड ट्रिपचे एकूण २६ हजार होतील. येथे फिरणे म्हणजे नवी दिल्लीच्या पहाडगंज येथे फिरण्यापेक्षाही स्वस्त आहे. जर तुम्ही सफारी बुक केली तर ते तुमच्या रहाण्याचे, खाण्याची व्यवस्था करतात. यासाठी एका रात्रीचा खर्च २७०० रुपये आहे.
कंबोडिया : कंबोडिला किंगडम ऑफ वंडर असेही म्हटले जाते. येथील संस्कृती प्राचीन आणि सुंदर आहे. येथे राउंडट्रिपचा खर्च २५ हजार रुपये येईल. कंबोडियात बॅकपॅकर्स आणि बजेट ट्रॅव्हलर्ससाठी स्वस्ताचे ठिकाण आहे. येथे एका रात्रीचा खर्च ३०० रुपये इतका आहे.
तुर्की : या देशात फिरण्यासाठीचे विमान तिकीट ३५ हजार रुपयांपर्यंत आहे. येथे राहण्यासाठी तुम्ही डॉरमेटरी हॉस्टेल्स तसेच क्यूझीन्सची मजा घेऊ शकता. मात्र जर तुम्हाला इस्तंबूल, बेयोग्लू तसेच बॉसफॉरोस येथे फिरायचे असल्यास थोडे अधिक पैसे लागतील.
कतार : कतारमध्ये येण्या जाण्यासाठी तुम्हाला विमानाचा खर्च २० हजार रुपये येईल. ५ दिवस दोहा आणि धलअल मिसफिरमध्ये राहण्यासाठी १५ हजारांचा खर्च येईल. यासाठी तुम्हाला आधीच तिकीट बुक करावे लागेल.
थायंलड : हे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. कोलकाता येथून राउंड ट्रिपसाठी १० हजार रुपये लागतील. जर तुम्ही ग्रुपने जात असाल तर बजेट हॉटेलमध्ये थांबू शकता. येथील भाडे ६०० रुपये इतके आहे. थायलंडमध्ये अनेक जागा पाहण्यासारख्या आहेत.
इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये जाण्यासाठीचा राउंड ट्रिप खर्च साधारण २५ हजार इतका आहे. यासाठी तुम्हाला आधी तिकीट बुक करावे लागेल. जकार्ता येथे एयरबीएनबी आणि हॉस्टेलमध्ये रहाण्याचा खर्च एका रात्रीसाठी ७०० रुपये इतका आहे. येथे तुम्ही बाली, जावा, योग्यकर्ता, सुमात्रा या ठिकाणीही फिरु शकता.
भूतान : डायरेक्ट विमानाने जाण्यापेक्षा देशांतर्गत विमानाने बागडोगरा येथे जाण्यासाठी सहा हजार रुपये लाहतील. तेथून बसने सीमा पार कऱण्यासाठी १५०० रुपये लागतील. तेथून गेस्ट हाऊसमध्ये राहण्याचा खर्च एका रात्रीसाठी ५०० रुपयांपर्यंत आहे.
लेबनन : दिल्लीवरुन येथे जाण्यासाठी राउंड ट्रिपचा खर्च २५ हजार रुपये इतका आहे. तेथील हॉस्टेल्समध्ये राहण्यासाठी एका रात्रीचा १००० हजार रुपये खर्च येईल.
जॉर्डन : कोचीहून जॉर्डनसाठी राउंड ट्रिपचा खर्च २३ हजार रुपये इतका आहे. जॉर्डनमध्ये तुम्ही हॉस्टेल्स, एयरबीएनबी आणि बजेट हॉटेल्समध्ये राहण्याचा कमीत कमी खर्च १५०० रुपये आहे.