मुंबई : फेब्रुवारी महिन्याचा सर्व तरुणाई मोठ्या उत्साहाने वाट पाहात असते. प्रेमाचा महिना समजल्या जाणाऱ्या या महिन्यात तरुणाई व्हॅलेंटाईन विकमध्ये वेगळे-वेगळे डे साजरे करते. कॉलेजमध्ये तर या दिवसांची मोठी धूम असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

७ फेब्रुवारीपासून 'व्हॅलेंटाईन्स वीक' सुरू होतो. पाहा कोणत्या दिवशी असतो कोणता डे.


७ फेब्रुवारी - रोज डे 


मुलींना गुलाबाचं फूल खूप आवडतं. यामुळे या दिवशी प्रेयसीला गुलाबाचे फूल देवून हा डे साजरा करतात. गुलाबाचं फूल हे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं.


८ फेब्रुवारी - प्रपोज डे 


८ फेब्रुवारी हा प्रपोज डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आवडणाऱ्या व्यक्तीला मनातली गोष्ट सांगून प्रपोज केलं जातं. प्रेमाची कबुली दिली जाते.  


९ फेब्रुवारी - चॉकलेट डे 


चॉकलेट डे म्हणजे काही खासच. कारण मुलींना चॉकलेट्स खूप आवडतात. या दिवशी प्रेयसीला आवडणारं चॉकेलेट देऊ शकता.



१० फेब्रुवारी  - टेडी बिअर डे


तुमची आठवण सतत प्रेयसीला देणारी कोणती गोष्ट असेल तर ती आहे टेडी बिअर. मुलींना टेडी बिअर देखील खूप आवडतो. त्यामुळे या दिवशी गर्लफ्रेंडला टेडी बिअर दिला जातो.


११ फेब्रुवारी - प्रॉमिस डे 


व्हॅलेंटाईन वीकमधला हा प्रॉमिस डे देखील खासच आहे. या दिवशी अनेक जण एकमेकांना काहीतरी वचन देतात. यामुळे नातं आणखी घट्ट होतं. महत्त्वाचा प्रामिस तुम्ही तुमच्या प्रेयसीला देऊ शकता.


१२ फेब्रुवारी - हक डे


गळाभेट घेणं म्हणजे सगळं काही विसरून जाण्यासारखंच आहे. जेव्हा तुम्ही प्रेयसी किंवा प्रियकराची भेट घेता तेव्हा तुम्ही आणखी रोमँटिक फिल करता. हक डेला हक करत तुमच्या पार्टनरला त्याचं महत्त्व किती आहे हे नक्की सांगा. 


१३ फेब्रुवारी - किस डे


प्रेमसंबंधामध्ये किस ही आता साधारण गोष्ट झाली आहे. किस हे तुमचे नाते अधिक घट्ट् करते. त्यामुळे जोडीदाराच्या सहमतीने योग्य वेळी किस करा. 


१४ फेब्रुवारी - व्हॅलेंटाईन डे 


विकचा शेवटचा दिवस असतो तो व्हॅलेंटाईन डे. अनेक जण या दिवशी रोमँटिक ठिकाणी फिरायला जातात. प्रेम व्यक्त करण्याचा हा देखील महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवसाची तरुणाई आतुरतेने वाट पाहात असतात.