पुणे :  गेल्या काही दिवसापूर्वी सोशल मीडिावर जगातील सर्वात फास्ट कॅशिअर नावाने एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओला महिला कॅशिअरला जगातील फास्टेस्ट कॅशिअर इन द वर्ल्ड म्हणून तिची मस्करी करण्यात आली. पण याचे सत्य जाणून घेतल्यावर तुम्हांला हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यावर संताप पण येईल आणि तुमच्या डोळ्यात पाणीही येईल.  (व्हिडिओ मागची काहणी खाली दिली)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हायरल व्हिडिओ 'बँक ऑफ महाराष्ट्र'तील पुण्यातील रावेत ब्राँन्चचा असल्याचा दावा व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. यात एक वयस्क महिला कॅशिअर दिसते आहे. या व्हिडिओला कॅश काऊंटरच्या बाहेर असलेल्या व्यक्तीने शूट केले आहे. यात महिला रुपये मोजताना दिसत आहे. ती नोट मशीनने चेक करते आणि मग चेक डिटेल कम्प्युटरवर फीड करते, काम इतके हळू करते की पाहणाऱ्याला संताप येईल. 


 



२४ ऑक्टोबरला हा व्हिडिओ पोस्ट झाला पण काही दिवसात तो खूप व्हायरल झाला. या व्हिडिओला दोन लाख लोकांनी शेअर केले आहे. काहींनी याची सत्यता न माहिती करू घेता वाईट कमेंट टाकल्या आहेत. तसेच या महिलेला कामावरून काढून टाकण्याची मागणी केली आहे. पण हा व्हिडिओचे सत्य तुम्हांला माहिती पडले तर त्या महिलेबद्दलचे मत त्वरित बदलून जाईल. संपूर्ण हकीकत ऐकली तर तुम्हांला ती प्रेरणा देईल. 


व्हिडिओचे सत्य...


या व्हिडिओमध्ये दिसणारी महिलेचे नाव प्रेमलता शिंदे आहे. त्या अनेक वर्षापासून बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये काम करतात. फेब्रुवारी २०१७मध्ये त्या रिटायर होणार आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार प्रेमलता यांना काही दिवसांपूर्वी पॅरालिसीस आणि दोन हार्ट अॅटक आले आहेत. बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांचा जीव वाचविण्यात यश आले. त्यांच्या पतीचे निधन झाले आहे, त्यांचा मुलगा आपल्या कुटुंबासोबत परदेशात राहतात. सध्या प्रेमलता यांच्यावर उपचार सुरू आहे. पण प्रेमलता यांना अशा प्रकारे रिटायर व्हायचे नाही. त्यांना ठरलेल्या वेळेत रिटायर व्हायचे आहेत. त्यामुळे त्यांनी पॅरालिसीस झाले असताना कामावर येण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या बँकच्या स्टाफने एक वेगळ्या कॅश काउंटरची व्यवस्था केली आहे. त्याचा स्पीड नेहमीच्या कामापेक्षा कमी आहे.