मुंबई : प्राणी आणि पक्षांना दोन मिनिटांत निद्रेच्या स्वाधीन करणाऱ्या एका चिमुरडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. 


आकाशात उडणारे पक्षी असो.... पाल असो किंवा मगर... ही चिमुरडी अवघ्या काही क्षणांत या प्राणी आणि पक्षांनाही झोपायला भाग पाडताना या व्हिडिओत दिसतेय. एका रिअॅलिटी शोचा हा व्हिडिओ आहे. या कार्यक्रमातले जजेसदेखील हा प्रकार पाहून अवाक झालेत.