मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोन नवी ऑफर घेऊन आलं आहे. व्होडाफोनच्या या ऑफरमध्ये ग्राहकांना ३४२ आणि ३४६ रुपये मोजून २८ GB इंटरनेट डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे.


काय आहे व्होडाफोनची नवी ऑफर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- ३४२ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना महिन्याला २८ GB इंटरनेट डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दिवसाला एक GB इंटरनेट डेटा वापरता येईल.


- ३४६ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना महिन्याला १० GBचा इंटरनेट डेटा २८ दिवसांसाठी मिळेल. याबरोबरच प्रत्येक दिवसाला ३०० मिनिटांचा व्हॉईस कॉल फ्री मिळणार आहे.


- या दोन्ही ऑफर १५ मार्चपर्यंत व्हॅलीड असणार आहेत.


- १५ मार्चपूर्वी या प्लॅनचा रिचार्ज करणाऱ्यांना आणखी २८ दिवसांची सुविधा फ्री मिळणार आहे.


- व्होडाफोनची ही स्कीम फक्त प्रिपेड ग्राहकांनाच मिळणार आहे.


- ही स्कीम घेणाऱ्या ग्राहकांना पुढच्या ११ महिन्यांसाठी हाच प्लॅन लागू ठेवता येईल.