लवकरच, युजर्सला फ्री मिळणार इंटरनेट सुविधा!
लवकरच भारतातील नागरिकांना स्वस्त दरात किंवा फ्री मध्ये इंटरनेट सेवा मिळू शकतात.
नवी दिल्ली : लवकरच भारतातील नागरिकांना स्वस्त दरात किंवा फ्री मध्ये इंटरनेट सेवा मिळू शकतात.
अशी चर्चा सुरू होण्यामागचं कारण म्हणजे, टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आर एस शर्मा यांनी या चर्चेची सुरूवात केलीय. सर्व लोकांना कमीत कमी दरात किंवा फ्री मध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे. टोल फ्री लँड लाईन नंबर्सची सुविधा असते त्याचप्रमाणे ही सुविधा असू शकेल.
या माध्यमातून इंटरनेट घराघरांत पोहचू शकेल, असा विश्वास शर्मा यांना वाटतोय. त्यासाठी हा प्रस्ताव मांडला गेलाय आणि त्यावर चर्चा सुरू आहे. यामुळे नेट न्यूट्रॅलिटीच्या कोणत्याही कायद्याचा भंग होणार नाही, असंही त्यांनी म्हटंलय.
काय आहे ही नेमकी सुविधा
या सुविधेविषयी बोलताना शर्मा म्हणतात, जर कॅनॉट प्लेसमध्ये एखाद्या दुकानात सेल लागला तर तो सर्वच लोकांसाठी खुला असतो... एखाद्याच रस्त्याने येणाऱ्या ग्राहकांसाठी हा सेल नसतो... त्याचप्रमाणे इंटरनेटवरचा फ्री किंवा डिस्काऊंटेड कन्टेंट सर्व इंटरनेट युजर्ससाठी खुला व्हायला हवा.... तो कोणत्याही मोबाईल सर्व्हिस युजर्ससाठी मर्यादित नसावा.
फेसबुकच्या 'फ्री बेसिक्स'वर सध्या काही वेबसाईटचा एक्सेस आहे आणि तो रिलायन्स कम्युनिकेशनच्या सबस्कायबर्सद्वारे उघडला जाऊ शकतो.