मुंबई : भारतीय संस्कृतीमध्ये विवाह पद्धतीला खूप महत्त्व आहे. विवाहाची तयारी सुरु ही लग्न पत्रिकेपासून होते. प्रत्येकाला असं वाटतं की त्यांच्या विवाहाची लग्नपत्रिकाही हटके असावी. यासाठीच आता लग्नपत्रिकेबाबत अनेक वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर अशीच एक लग्न पत्रिका सध्या चांगलीच व्हायरल होतेय. अशी लग्नपत्रिका तुम्ही कधी पाहिली नसेल. या विवाहपत्रिकेत लिहिलं गेलं आहे की, तुम्ही आशीर्वाद पेटीएमच्या माध्यमातून देखील पाठवू शकता. या पत्रिकेच्य़ा शेवटी असं लिहिण्यात आलं आहे की हे सगळं प्रदुषण रोखण्यासाठी आहे.