का वाढतंय मुला-मुलींचं लग्नाचं वय?
तरूण तरूणींच्या लग्नाचे वय वाढत असल्याचं सर्वत्र आहे . मुलांचं लग्न आता ३६ वर्ष वय झाल्यानंतर होतं, तर मुली देखील ३० वय गाठतात. यापूर्वी मुलींचं जेमतेम २३ वर्ष होतं आणि मुलांचं २९. पण आता लग्नाचं वय सर्वांचं वाढलंय.
मुंबई : तरूण तरूणींच्या लग्नाचे वय वाढत असल्याचं सर्वत्र आहे . मुलांचं लग्न आता ३६ वर्ष वय झाल्यानंतर होतं, तर मुली देखील ३० वय गाठतात. यापूर्वी मुलींचं जेमतेम २३ वर्ष होतं आणि मुलांचं २९. पण आता लग्नाचं वय सर्वांचं वाढलंय.
लग्नाचं वय वाढण्याची काही महत्वाची कारणं
शिक्षण आणि करिअर
मुली आज करिअरला सर्वात महत्वाचं स्थान देतात. यामुळे मुलींना योग्य ते स्वातंत्र्य मिळतं, मुलींनी करिअरकडे जास्त लक्ष दिल्याचं दिसून येतं.
आधी पदवीनंतर मुलीच्या लग्नाची तयारी व्हायची, पण आता मुली पदव्युत्तर शिक्षणही घेतात, आणि यामुळे नोकरी करणाऱ्या मुलींच्या संख्येतही वाढ झाली आहे. अर्थात या मुलींची अपेक्षा देखील आपल्या बरोबरीचं शिक्षण आणि नोकरी करणाऱ्या मुलाशी लग्न व्हावं अशी अपेक्षा असते.
लव्ह मॅरेज असो अथवा अॅरेंज मॅरेज असो
दुसरीकडे मुलांनाही नोकरीवाली व करियरवाली मुलगी हवी आहे, त्यामुळे मुलींचेही लग्नाचे वय पुढे गेले आहे.
समजून घेण्यासाठी वेळ- लव्ह मॅरेज असो अथवा अॅरेंज मॅरेज असो, मुलगा आणि मुलगी दोघांनाही या बंधनात पडण्यापूर्वी एकमेकांना समजून घेण्याची आवश्यकता वाटते आहे. त्यामुळे पूर्ण ओळख झाल्यावर अथवा साखरपुडा झाल्यानंतरही सहा महिन्यांनंतरच लग्नाचा विचार केला जात असल्याचे दिसून येत आहे. आवडनिवड जुळली, विचार जुळले तरच लग्नाचा निर्णय घेतला जातो.
लिव्ह इन रिलेशनशीप
लिव्ह इन रिलेशनशीपला भारतात कायद्याने मान्यता दिली गेली आहे. 'राईट टू लाईफ' या कायद्याअंतर्गत ही मान्यता दिली गेली आहे. त्यामुळे अनेकजण या पर्यायाचाही विचार करताना दिसत आहेत.दीर्घकाळ पतीपत्नीसारखे राहणार्या जोडप्यांचे कालांतराने पटले नाही तर महिलांना पोटगीचा अधिकार दिला गेला आहे.
परफेक्ट मॅच
दोन दशकांपूर्वी उपवर मुलीला स्वयंपाक करता आला, घरकाम करता आले की पुरेसे होत असे तसेच मुलाला चांगला पगार आणि घरदार असले की मुलींच्याही फारशा अपेक्षा नसत. आता गरजा वाढल्याने मुलांना शिकलेली, मिळवती मुलगी हवी असते तर मुलीही घरकामात मदत करणारा, विचार जुळणारा मुलगा हवा यासाठी कांही काळ वाट पाहण्यास तयार आहेत. या व अशा अनेक कारणांनी लग्नाचे वय मात्र पुढे गेले आहे.
ड्रीम विडिंग
आजकालच्या मुलामुलींसाठी लग्न हे ड्रीम आहे. त्यात मुलींना लग्नाचे स्थळ, हनीमून, लग्नाचे कपडे व पुढचे आयुष्य सुखी समाधानी असेल याची शाश्वती हवी असल्याचे दिसते तर मुलांना लग्नानंतर येणार्या जबाबदार्यांची पूर्ण जाणीव आहे व त्यामुळे स्थिर करियर, सेव्हींग तगडे असावे अशी अपेक्षा आहे. पूर्वीच्या तुलनेत आज करियरसाठीची स्पर्धाही तीव्र आहे त्यामुळे चांगली जीवनशैली जगताना घर, गाडी असणेही आवश्यक वाटते आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी थोडा अवधी हवा म्हणून लग्नाचे वय वाढत चालले आहे.