मुंबई : तुम्ही कधी विचार केलाय का की जीन्सच्या लहान पॉकेटवर जी लहान बटणे असतात ती कशासाठी असतात. या बटनांना रिवेट्स असं म्हटलं जात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही म्हणाल ही बटणे केवळ दिखावा म्हणून लावलेली असतात अथवा प्रत्येक कंपनीची ब्राँडिंगची पद्धत असते तर तुम्ही चुकताय. जीन्स बनवताना गरजेचे म्हणून रिवेट्सचा वापर केला जातो.


सुरुवातील कामगार मोठ्या प्रमाणात जीन्स घालत असत. यावेळी जीन्सची पॉकेट्स लवकर फाटत असत. या समस्येवर जॅकोब डेविस नावाच्या टेलरने १८७३मध्ये तोडगा काढला. जॅकोब अमेरिकेच्या रेनो नेवाडा येथे राहत होता. 


पॉकेट शिवताना त्या फाटू नयेत यासाठी त्याने तेथे रिवेट्सचा वापर करायचे ठरवले. यामुळे पॉकेट्सच्या दोन्ही बाजूंनी ही रिवेट्स लावली जातात. यामुळे पॉकेट्सची शिलाई अधिक मजबूत राहते. याच्या पेटंटसाठी जॅकोबकडे त्यावेळी पैसे नव्हते. त्यामुळे त्याने सॅन फ्रँन्सिस्कोच्या लेव्ही स्ट्रॉस नावाच्या होलसेलरशी संपर्क केला आणि त्याला पेटंट बनवण्यास सांगितले. २० मे १८७३मध्ये हे पेटंट झाले. 


१८९०मध्ये हे पेटंट सार्वजनिक करण्यात आले. त्यानंतर कोणीही याचा वापर करु शकत होते. तेव्हापासून आतापर्यंत जीन्सच्या पॉकेटवर छोटी बटणे असतात.