व्हॉट्सअॅपवरुन चुकून पाठवलेले मेसेज एडिट करता येणार
व्हॉट्सअॅपवरुन पाठवलेला मेसेजे धनुष्यातील बाणासारखा असतो. जो एकदा पाठवल्यावर मागे घेता येत नाही. म्हणजेच एखादा मेसेज अर्धवट असेल वा चुकीचा असेल तर एकदा सेंड झाल्यास तो मागे घेता येत नाही.
मुंबई : व्हॉट्सअॅपवरुन पाठवलेला मेसेजे धनुष्यातील बाणासारखा असतो. जो एकदा पाठवल्यावर मागे घेता येत नाही. म्हणजेच एखादा मेसेज अर्धवट असेल वा चुकीचा असेल तर एकदा सेंड झाल्यास तो मागे घेता येत नाही.
तसेच घाईच्या वेळेसही एखाद्याला मेसेज पाठवायचा असल्यास तो भलत्याच व्यक्तीला सेंड होतो. यामुळे आपली फजिती होतेच. हे टाळण्यासाठी व्हॉट्सअॅपने नवे फीचर आणलेय. ज्यात तुम्ही चुकून पाठवलेला मेसेज एडिट करु शकता.
मीडिया रिपोर्टनुसार, लवकरच व्हॉट्सअॅपवर अशा प्रकारचे फीचर येत आहे. ज्यामुळे तुम्ही चुकून पाठवलेला मेसेज एडिट करु शकता. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला तुम्ही चुकून मेसेज केला तर तो एडिट करु शकणार आहात. कंपनीने या फीचरचे टेस्टिंग सुरु केलेय. दरम्यान हे नवे फीचर व्हॉट्सअॅपमध्ये कधी येणार याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.