व्हॉटसअपनं यूझर्सना दिली खुशखबर...
व्हॉटसअपमध्ये नुकतेच इमोजी, डॉक्युमेन्ट, थर्ड पार्टी अॅप शेअरिंगसारखे फिचर्स देण्यात आलेत... यानंतर व्हॉटसअपनं आपल्या अॅपमध्ये आणखी काही महत्त्वाचे बदल करत यूझर्सना एक खुशखबरही दिलीय.
मुंबई : व्हॉटसअपमध्ये नुकतेच इमोजी, डॉक्युमेन्ट, थर्ड पार्टी अॅप शेअरिंगसारखे फिचर्स देण्यात आलेत... यानंतर व्हॉटसअपनं आपल्या अॅपमध्ये आणखी काही महत्त्वाचे बदल करत यूझर्सना एक खुशखबरही दिलीय.
नवं अपडेट व्हॉटसअप यूझर्सना फ्रीमध्ये उपलब्ध होणार आहे. इतकंच नाही, तर या अॅपवरचं पेमेंटचं ऑप्शनही हटवण्यात आलंय.
आपल्या सेटींग फिचरमध्ये अनेक बदल केल्यानं यूझर्सची प्रोफाईल आता आणखी आकर्ष दिसणार आहे.
सध्या व्हॉटसअपचं हे अपडेट व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही... परंतु, बीटा टेस्टरवर लॉग-इन करून तुम्ही या अपडेटसची ट्रायल घेऊ शकता. कंपनी सध्या, या अपडेटच्या बीटा व्हर्जनवर काम करतेय. लवकरच हे प्ले स्टोअरवरही उपलब्ध होईल.
अपडेट व्हर्जनमध्ये सेटिंग मेनू आणखी सोप्पा करण्यात आलाय. आता तुम्हाला प्रोफाईल आणि स्टेटस दोन्हीही ऑप्शन एकत्रच दिसतील. यासाठी तुम्हाला वेगवेगळी सेटिंग ऑप्शन नाही तर एकाच जागी दोन्ही दिसतील.
नवीन व्हर्जनमध्ये अॅपचा स्पीड आणि बगची तक्रारही दूर करण्यात आलीय.