मुंबई : इन्संट मॅसेजिंग अॅप व्हॉटसअॅपने काही फीचर्स अपडेट केले आहेत, ज्यात व्हिडीओ झूम आणि थर्ड पार्टी अॅप कटेन्ट शेअरिंग सारखे पर्याय आपणास मिळतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीने आणखी एक फीचर जोडलं आहे, ज्याच्या मदतीने व्हॉटसअॅप डॉक्यूमेंट फाईलही शेअर करता येणार आहे.


व्हॉटसअॅपमध्ये ही सेवा अॅपलसाठी आहे, मात्र एंड्रॉयडमध्ये ही सेवा बीटा वर्जनवर सुरू राहणार आहे. मात्र लवकरच ही सेवा एंड्रॉईड युझर्ससाठी मिळणार आहे.


अॅपलवर ही फीचर व्हॉटसअॅपच्या अपडेट 2.12.14 वर्जनवर उपलब्ध आहे, या नव्या फीचरचा वापर आयओएस 6.0 किंवा त्यावरील वर्जनमध्ये वापरता येणार आहे.


आयओएस युझर्स अॅप स्टोरवर जाऊन नवीन अपडेट डाऊनलोड करता येणार आहेत.
अंड्राईड युजर्ससाठी नवं अपडेट व्हॉटसअप बीटी वर्जन 2.12.493 उपलब्ध आहे. ज्याला अजून रिलॉन्च करण्यात आलेले नाही.


तुम्ही आता डॉक्युमेंटही शेअर करू शकणार आहेत. व्हॉटस अॅप अटॅचमेंट बटनवर क्लिक करा, समोर कॅमेरा, ऑडिओ, लोकेशन आणि कॉन्टॅक्ट दिसणार आहे, डॉक्युमेंटचाही पर्याय उपलब्ध असेल.


इंस्टंन्ट मॅसेजिंग अॅप व्हॉटसअॅपने अपडेट केलेल्या वर्जनमध्ये व्हिडीओ झूम, थर्ड पार्टी अॅप कटेंट शेअरिंगसारखे ऑप्शन मिळणार आहेत.