लाल लिपस्टिक लावल्यानंतर मुलींच्या मनात कोणते विचार येतात
मुलींच्या मेकअपमध्ये अधिक स्थान असते ते लिपस्टिकला. यामुळे चेहऱ्याची शोभा खुलते. मेकअप आर्टिस्टच्या मते रेड लिपस्टिक तुमच्यातील कॉन्फिडन्स दर्शवते.
मुंबई : मुलींच्या मेकअपमध्ये अधिक स्थान असते ते लिपस्टिकला. यामुळे चेहऱ्याची शोभा खुलते. मेकअप आर्टिस्टच्या मते रेड लिपस्टिक तुमच्यातील कॉन्फिडन्स दर्शवते.
तसेच जर तुम्ही डेटवर जात असाल तर लिपस्टिकची लाल शेड वापरा. यामुळे इंप्रेशनही छान पडते. लाल लिपस्टिक लावल्यावर मुलींच्या मनात हे अजीब विचार येत असतात.
१. लाल लिपस्टिक लावल्यानंतर आत्मविश्वास तर वाढतो मात्र इतर मुली पाहत असल्यास तेव्हा त्यांना वाटते की मी लावलेली लिपस्टिक जास्त तर झाली नाही ना? दातांवर तर लिपस्टिकचा कलर लागला नाही ना...
२. लिपस्टिक लावल्यानंतर खाता-पिताना लक्ष द्यावे लागते. लिपस्टिक पुसली जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते.
३. लाल लिपस्टिक लावल्यास हा रंग मला चांगला तर दिसतोय ना?...यात काही विचित्र दिसत नाहीये ना? असे काहीसे विचार मुलींच्या मनात येतात.
४. मला एकदा वॉशरुममध्ये जाऊन लिपस्टिक नीट आहे ना हे पाहिलं पाहिजे.