एटीएम कार्डवर १६ डिजीट नंबर का असतो ?
रोख रक्कम न बाळगता आता एटीएम कार्डचा मोठा वापर होत आहे. आज अनेकांकडे एटीएम कार्ड आहे. नवीन नवीन गोष्टींसह एटीएम सुविधा बँकेकडून उपलब्ध होत आहेत. या एटीएम कार्डवर आपल्या नावासह अनेक माहिती प्रिंट केलेली असते. पण महत्त्वाचा असतो तो आपला एटीएम कार्डवरील एटीएम नंबर जो १६ अंकी असतो.
मुंबई : रोख रक्कम न बाळगता आता एटीएम कार्डचा मोठा वापर होत आहे. आज अनेकांकडे एटीएम कार्ड आहे. नवीन नवीन गोष्टींसह एटीएम सुविधा बँकेकडून उपलब्ध होत आहेत. या एटीएम कार्डवर आपल्या नावासह अनेक माहिती प्रिंट केलेली असते. पण महत्त्वाचा असतो तो आपला एटीएम कार्डवरील एटीएम नंबर जो १६ अंकी असतो.
एटीएम कार्डवरील हे अंक १६ डिजीट का असतात हे तुम्हाला माहित आहे का ? या १६ अंकी डिजीटचा अर्थ आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
एटीएम कार्डचं पहिलं डिजिट हे सांगतं की, कार्ड कोणी जारी केलं आहे. याला मेजर इंडस्ट्री आइडेंटिफायर म्हणतात. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळी डिजीट दिलेली असते.
0- ISO आणि इतर इंडस्ट्री
१. एयरलायन्स
२- एयरलायन्स आणि अन्य इंडस्ट्री
३- ट्रॅवल आणि एंटरटेनमेंट (अमेरिकन एक्सप्रेस किंवा फूड क्लब)
४- बँकिग आणि फायनांस (वीजा)
५- बँकिग आणि फायनांस (मास्टर कार्ड)
६- बँकिग आणि मर्चेडाइजिंग
७- पेट्रोलियम
८- टेलीकम्यूनिकेशन्स आणि इतर इंडस्ट्री
९- नॅशनल असाइनमेंट
त्यानंतर पुढचे ६ डिजीट दर्शवतात की, कोणत्या कंपनीने एटीएम, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड जारी केलं आहे. याला Issuer Identification Number (IIN) म्हणतात.
अमेरिकन एक्सप्रेस- 34XXXX, 37XXXX
वीजा- 4XXXXX
मास्टर कार्ड- 51XXXX-55XXXX
आता त्याच्या पुढचं ९ अंकी डिजीट हे बँक एकाउंट नंबरशी लिंक केले जातात. हा पूर्णपणे बँक अकाउंट नंबर नसतो. पण त्यानेच लिंक होतं. क्रेडिट किंवा डेबिट कार्डचं शेवटचं डिजीट चेक डिजीटच्या नावाने जाणलं जातं.
एटीएम कार्ड नंबर ने माहिती पडतं की ते कार्ड वैध आहे की नाही. जर तुम्ही तुमच्या कार्डचा वापर करता तर त्यासोबत तुम्हाला एक पिन दिला जातो. ज्याच्या मदतीने मग तुम्ही त्याचा वापर करता.