मुंबई : एखाद्या मुलीला मेसेज केल्यानंतर ती रिप्लाय का देत नाहीत असा प्रश्न नेहमी मुलांना सतावत असतो. जरी ते ही गोष्ट कोणाला सांगत नसतील तरी मेसेजला रिप्लाय न दिल्यामुळे त्यांना फ्रस्टेशन होते. याची पाच कारणे असू शकतात. ही आहेत पाच कारणे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनोखळ्या व्यक्तींपासून दूर राहतात - तुमचा नंबर एखाद्या मुलीसाठी अनोळखी असेल तर ९९ टक्के तुम्हाला रिप्लाय मिळणार नाही. मुली अनोळखी व्यक्तींच्या मेसेज अथवा कॉलला रिप्लाय देत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर समोरच्या मुलीशी ओळख काढायची असेल तर तिच्याशी आधी मैत्री करा. त्यानंतर तुमचा नंबर देऊन मेसेज करा. तेव्हा कदाचित ती तुम्हाला रिप्लाय देईल. 


आधीच रिलशेनशिपमध्ये असण्याची शक्यता - जर ती मुलगी आधीच रिलेशनशिपमध्ये असेल तर ती तुमच्या मेसेजना रिप्लाय देणं गरजेचं समजणार नाही. तसेच एकाचवेळी दोन मुलांशी संपर्कात राहण्याची सवय फार कमी मुलींना असते. 


रागावली असण्याची शक्यता - ती तुमच्या मेसेजना रिप्लाय देत नसेल याचे आणखी एक कारण म्हणजे ती तुमच्यावर रागावली असण्याची शक्यता आहे. तिला तुमची एखादी गोष्ट खटकली असावी. 


पटकन नातेसंबंध स्वीकारण्याची तयारी नसणे - मुलींना कोणत्याही नात्याला स्वीकारण्यासाठी वेळ लागतो. सुरुवातीला ती समोरच्या व्यक्तीला समजून घेते. त्यानंतरच रिलेशनशिपमध्ये ती पुढे जाईल. त्यामुळे एकदम घाई नको. 


गिव मी ब्रेक प्लीज - कधी कधी काही गोष्टी कन्फ्यूज करतात. अथवा त्या समजण्यास अवघड जातात. त्यामुळे त्यांना ब्रेक हवा असतो. तसेच एखाद्या महत्त्वाच्या कामात गुंतल्यामुळे ती बिझी असावी यामुळे ती मेसेजना रिप्लाय देत नसेल.