कीबोर्डवरच्या f आणि j बटनाच्या खाली मार्क का असतो
दरदिवशी कम्प्युटर तसेच टेक्नॉलॉजीमध्ये काहीनाकाही बदल होत असतात. दरदिवशी आपण दिवसातील सात ते आठ तास कम्प्युटरसमोर बसून काम करत असतो.
मुंबई : दरदिवशी कम्प्युटर तसेच टेक्नॉलॉजीमध्ये काहीनाकाही बदल होत असतात. दरदिवशी आपण दिवसातील सात ते आठ तास कम्प्युटरसमोर बसून काम करत असतो.
मात्र काम करताना तुम्ही हे नोटीस केलंय का की कीबोर्डवर f आणि j बटनाच्या खाली मार्क का असतो. त्यामागेही कारण आहे. टायपिंगच्या नियमानुसार कीबोर्डवर हा मार्क देण्यात आलाय.
स्क्रीनवर बघून टाईप करत असताना टाईपिंगच्या नियमानुसार अंगठ्च्या बाजूचे बोट f आणि j या अक्षरावर असणे गरजेचे असते. तसेच इतर बोटे कीबोर्डवरच्या इतर अक्षरांवर असणे गरजेचे असते. त्यामुळेच योग्य प्रकारे टायपिंग करता यावे यासाठी या दोन्ही अक्षरांखाली हा मार्क असतो.