नवी दिल्ली : गुगलने दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांकडून इंटरनेटचा अधिक वापर होतोय. विविध वयोगटातील पुरुषांच्या तुलनेत महिला इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातील प्रत्येक तीन महिलांपैकी एक महिला इंटरनेटचा वापर करते. तर चारपैकी केवळ एकच पुरूष इंटरनेटचा वापर करतो. भारतातील स्त्रीया विशेषत: माता सौंदर्यापासून फॅशनपर्यंत आणि आरोग्यपासून फिटनेसपर्यंतच्या माहितीचा शोध घेण्यासाठी इंटरनेटचा अधिक वापर करतात. 


पुरुषांपेक्षा महिलांनी इंटरनेटवर अधिक वेळ खर्च करणे, ही खूप मोठी गोष्ट असे 'गुगल'कडून सांगण्यात आलेय. तसेच हे प्रमाण भविष्यात वाढणार आहे. भारतातील स्त्रियांचे जीवनमान बदलण्यात इंटरनेट महत्वाची भूमिका बजावत आहे.