टोकियो: पैसा हे व्यवहाराचे मोठे साधन आहे. व्यवहारातील गैरसोय दूर करण्याचे काम पैसा करत असतो. याच पैसा बचतीमध्ये भारतातील तरूण खूप मागे आहेत.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगातील विविध देशांमधील किती प्रमाणात तरुण वर्ग पैशांची बचत करतात याबाबत एक सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेतून ही माहिती समोर आलीये.
पैसाबचतीमध्ये जपानमधील तरूण अव्वल स्थानी आहेत.

जपानमधील ८० टक्के तरूण पैसा बचतीचा विचार करतात. त्यापाठोपाठच चीनचा नंबर येतो. चीनमधील ६७ टक्के, अमेरिकेतील ५८ टक्के, युकेमधील ५६ टक्के, पाकिस्तानमधील २५ टक्के आणि भारतातील ५० टक्के तरूण पैसाबचत करता. पैसाबचतीमधील इतर देशांतील तरूणांच्या तुलनेत भारत पाचव्या क्रमांकावर आहे.

भारतातील बहुतांश तरूण पिढी नोकरीसाठी गाव किंवा घर सोडून मोठ्या शहराकडे स्थलांतरित होते. त्यातील २८ टक्के तरूण वर्ग शहरात भाड्याने राहतात. ३० टक्के तरूण वर्ग हा महागड्या हॉटेल्स, पार्टी किंवा मौजमजेसाठी तसेच कपड्यांवर पैसा खर्च करत असतो.

भारतातील ७५ टक्के तरूणवर्ग नोकरी सोडून व्यवसायाकडे वळला आहे, तर २५ टक्के तरुण नोकरी करतात मात्र ते त्या नोकरीत समाधानी नाहीत. ६० टक्के तरूणांचे म्हणणे आहे की, व्यवसायात पैसाची बचत जास्त होते. तर ३० टक्के तरूणांचे म्हणणे आहे की, नोकरी करूनच पैसाची बचत होते.