ही आहे जगातील सर्वात महाग बाईक
स्वित्झर्लंडची कंपनी फेनाइल मोटारसाइकल्सने नुकतीच आपली हायटेक डिलक्स बाईक `फेनाइल वन` लॉन्च केली आहे. या बाईकला जगातील सर्वात महाग बाईक म्हटले जात आहे. फेनाइल वनची किमत २,८० हजार डॉलर म्हणजे (सुमारे १ कोटी ७५ लाख रुपये इतकी भारतीय चलनात याची किंमत आहे. कंपनीने आतापर्यंत केवळ ५० बाइक्स तयार केल्या आहेत.
स्वित्झर्लंड : स्वित्झर्लंडची कंपनी फेनाइल मोटारसाइकल्सने नुकतीच आपली हायटेक डिलक्स बाईक 'फेनाइल वन' लॉन्च केली आहे. या बाईकला जगातील सर्वात महाग बाईक म्हटले जात आहे. फेनाइल वनची किमत २,८० हजार डॉलर म्हणजे (सुमारे १ कोटी ७५ लाख रुपये इतकी भारतीय चलनात याची किंमत आहे. कंपनीने आतापर्यंत केवळ ५० बाइक्स तयार केल्या आहेत.
फेनाइल वन तयार करण्यासाठी सर्वात उच्चतम गुणवत्ता असलेले कार्बन, टायटेनियम, एरोस्पेस अॅल्युमिनिअम आणि उत्तम क्लॉलिटीच्या चामड्याचा वापर केल आहे. ही बाइक बनविण्यासाठी चार वर्ष रिसर्च करण्यात आला.
या बाइकमध्ये तीन सिलेंडरवाला ८०१ सीसी पॉवरचं इंजिन आहे. ६ स्पीड गिअर बॉक्स आहे. जो १७० बीएचपी पॉवर देतो. याचे वजन १५५ किलोग्रॅम आहे. फेनाइल वनचे पहिले मॉडल २०१७ च्या पहिल्या तिमाहीत लॉन्च होणार आहे.