मुंबई : स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं म्हणतात अशा आपल्या आईचं ऋण फेडणं अशक्य. मात्र आईबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याच्या आज दिवस. आज जागतिक मदर्स डे.


10 मे 1908 पासून मदर्स डे हा साजरा करण्यात येतो. फिलिडेल्फियाच्या ऍना जार्विस यांच्या संकल्पनेतून मदर्स डे सुरु झाला. आपल्या आई प्रती प्रेम, कृतज्ञता, आदर व्यक्त करण्यासाठी त्यांनी या दिवसाला मदर्स डे साजरा करण्यास सुरुवात केली. आज जगभरात मे महिन्यातील दुसरा रविवार हा मदर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो.