मुंबई : चीनमध्ये शाओमीने स्मार्टफोन 'रेडमी नोट प्रो' लॉन्च केला आहे.  हेलिओ X20 तसेच हेलिओ X25 या २ व्हर्जनमध्ये हा फोन लॉन्च करण्यात आला.  हेलिओ X20 या फोनची किंमत १५ हजार, तर X25 या फोनची किंमत २० हजार आहे.


फीचर्स - रेडमी नोट प्रो 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१३ मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा, ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
५.५  इंच आकाराची स्क्रीन
फिंगर प्रिंट सेन्सर
हेलिओ X20, ३ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज
हेलिओ X25, ४ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज


 शाओमीचा हा पहिलाच फोन की ज्या फोनमध्ये ३ कॅमेरे आहेत. या फोनमध्ये जबरदस्त क्वालिटीचे २ रिअर तर एक फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरा हा या फोनमधील आकर्षणाचा विषय आहे, भारतात हा फोन भारतात कधी येणार यावर चर्चा होत आहे.


 कंपनीने दावा केला आहे, डीएसएलआर कॅमेऱ्याप्रमाणे  या फोनच्या कॅमेऱ्याची क्वालिटी  असेल, तसेच हा फोन शाओमीच्या फोनपैकी सर्वात जबरदस्त क्षमतेचा फोन आहे.