मुंबई : शाओमीचा एमआय ५ हा स्मार्टफोन तुम्हाला आता विदाऊट रजिस्ट्रेशन घेता येणार आहे. येत्या ४ मेला ओपन सेलमध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाच मार्च रोजी कंपनीने हा स्मार्टफोन लाँच केला होता. या स्मार्टफोनमध्ये ५.१५ इंचाचा डिस्प्ले देण्यात आलाय. याचा फ्रंट कॅमेरा ४ मेगापिक्सेल आहे. तर रेयर कॅमेरा १६ मेगापिक्सेल इतका आहे. 


यात क्वालनकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर देण्यात आलाय. तसेच ३२ जीबी स्टोरेजची क्षमता आहे. यात ३ जीबी रॅम देण्यात आलाय. या स्मार्टफोनची किंमत २४ हजार ९९९ रुपये इतकी आहे.